चित्रलेखा पाटील…नव्या पिढीचा आशेचा किरण

  शब्दांकन – अमोल नाईक, जनसंपर्क अधिकारी पीएनपी एज्युकेशन सोसायटी
 

राजकारणातून  समाजकारण हा ज्येष्ठ नेते स्व.प्रभाकर पाटील यांनी घालून दिलेला वसा आणि वारसा पाटील परिवारातील आतापर्यंतच्या सर्वच पिढ्यांनी समर्थपणे सांभाळला आहे. समाजाचे  आपण काहीतरी देणं लागतो हीच भावना उराशी बाळगत तळागाळातील गरजूंना सर्वतोपरी मदत करण्याचे कार्य आजही अव्याहतपणे सुरु आहे.शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील या पाटील परिवाराचा हा वसा आणि वारसा समर्थपणे पुढे नेत आहेत.वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या सामाजिक,शैक्षणिक उपक्रमांचा हा आलेख.

 महाराष्ट्राच्या राजकारणात काही राजकीय कुटुंब, राजकारणात व समाजकारणात आपल्या कौटुंबिक परंपरेचा वसा अनेक वर्ष अगदी पिढ्यांपिढ्या जोपासत आहेत. रायगड जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते स्व.  प्रभाकर पाटील यांचा राजकीय व सामाजिक वारसा पुढे नेणारे शेतकरी कामगार पक्षाची धुरा समर्थपणे पेलणारे पाटील कुटुंबीय यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल.  या कुटुंबाचे कुटुंब प्रमुख व शेतकरी कामगार पक्षाचे सर्वेसर्वा  आमदार  जयंत पाटील यांनी आपल्या व्यक्तिमत्वाचा प्रभावी ठसा राजकारण, समाजकारण व प्रथित यश उद्योगपती म्हणून निर्माण केला आहे. शेकापची चौथी पिढी प्रभावीपणे काम करत आहे. या चौथ्या पिढी मध्ये राजकीय आणि शैक्षणिक पटलावरील सक्षम नेतृत्व म्हणून चित्रलेखा पाटील यांच्या कडे पाहिले जात आहे.
 पाटील घराण्याची सून अशी जरी चित्रलेखा पाटील यांची ओळख असली तरी त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवून स्वत:ची अशी ओळख निर्माण केली आहे. व्यापक व्हीजन ठेवून काम करणे हे त्यांचे खास वैशिष्टय आहे. किंबहुना यामुळे त्यांच्यावर जी जबाबदारी टाकली जाते ती त्या उत्तमपणे निभावतात. जगात जे काही चांगलं उत्तम. नवनवीन सुरू आहे ते रायगडातील अत्यंत सामान्यांतील सामान्य व्यक्तिला, विद्यार्थ्यांना मिळावे ते त्यांच्या पर्यंत पोहचावे अशी त्यांची प्रामाणिक इच्छा असते. ग्लोबल नॉलेज उंबरठ्यापर्यंत आणण्याचे स्वप्न त्या नेहमी पाहत असतात.      
 शेकाप महिला आघाडी प्रमुख, अलिबाग नगरपरिषद नगरसेविका, सीएफटीआयच्या सल्लागार, पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह म्हणून विविध भूमिका अत्यंत समर्थपणे सांभाळणार्‍या चित्रलेखा पाटील या कोरोना आपत्ती आणि त्या मागोमाग आलेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या आपत्तीमध्ये आपल्या सामाजिक बांधिलकीतून जनसामान्याकरिता सक्रिय कार्यरत राहिल्या.
पाटील कुटुंबाचा सामाजिक बांधिलकीचा वारसा पुढे नेत असताना या दोन्ही आपत्तीत त्यांनी  केलेले काम अनन्यसाधारण असेच आहे.  शेकापच्या माध्यमातून त्यांनी फ्यूमिगेशन लिक्विडचे वाटप, 2 लाख  गरजू बांधवांना अन्नधान्य वाटप, सिव्हील हॉस्पिटल मध्ये अन्नदान, आदिवासी वाडी आणि गरजूंना पत्र्यांचे वाटप, सामाजिक बांधिलकीच्या भावनेने 50,000 लोकांना खिचडी वाटप, जिल्हा रुग्णालयाला व्हेंटीलेटर भेट दिले.
कोरोना काळात जिल्हा रुग्णालयासोबत सक्षमपणे उभे राहून कोरोना रुग्णांची सेवा करण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून विविध साहित्य तसेच आयसीयु बेड, ऑक्सिजन अशा प्रकारे जवळपास एक कोटी रकमेचे साहित्य सुपूर्द केले.
रुग्ण सेवा हीच ईश्‍वर सेवा मानून देशासह, राज्यात, जिल्ह्यात अलिबाग तालुक्यात कोरोनाचा  उद्रेक दिवसेंदिवस वाढत चाललेला होता, अलिबागमध्ये रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत होती, रुग्णांना बेड उपलब्ध होत नव्हते तर काही ठिकाणी ऑक्सिजन अभावी रुग्णांना मृत्यूला सामोरे जावे लागत होते. या करिता  अलिबाग ( श्रीबाग ) येथे तोडकरी कोव्हीड केअर सेंटर उभारले आणि रुग्णांना चांगली सेवा दिली तर गावोगावी शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून मोफत लसीकरण मोहीम राबविली.
 खेड्यातील मुलींचे शाळेतील वाढणारे गळतीचे प्रमाण लक्षात घेऊन गरीब आणि गरजू मुलींना सावित्रीच्या लेकी चालल्या पुढे या शीर्षकाखाली चित्रलेखा पाटील यांच्या माध्यमातून आत्तापर्यंत जवळपास 3 हजार 750 हून अधिक मुलींना मोफत सायकल वाटप केले आहे. आणि पुढील काळात 1 लाख मुलींना सायकल वाटपाचा संकल्प आहे.
कोरोना काळात ऑनलाईन शिक्षणाचे महत्त्व वाढल्याने त्यासाठी लागणार्‍या  मोबाईल आणि टॅबची देखील मागणी वाढली. कोरोनामुळे आर्थिक परिस्थिती बिकट असतानाच विद्यार्थ्यांना टॅब ( स्मार्टफोन ) घेणे शक्य होत नव्हते. विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात जाऊ नये, याकरिता शेतकरी कामगार पक्षाने पुढाकार घेत टॅब वाटप मोहीम हाती घेतली. याच पाश्‍वर्र्भूमीवर अलिबाग  नगरपरिषदेच्या  हद्दीतील 100, धारावीतील विद्यार्थ्यांना त्याच प्रमाणे महाराष्ट्रातील गरजू 860 गरजू विद्यार्थ्यांना टॅबचे ( स्मार्टफोन ) वाटप करण्यात आले.
सदैव सर्वांसाठी तत्पर असणारे बहुआयामी व्यक्तिमत्व असली काम करणार्‍या  चित्रलेखा पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा !!!

Exit mobile version