चित्रलेखा पाटील यांच्याकडून पाटील कुटुंबियांचे सांत्वन

| अलिबाग | प्रतिनिधी |

शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते मधूकर पाटील (75) यांचे नुकतेच निधन झाले. शेकापच्या राज्य मिडीया सेलच्या अध्यक्षा तथा प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी शनिवारी (दि.12) सकाळी सागाव येथे जाऊन पाटील कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली.

मधूकर पाटील यांचे 6 जुलैला अल्पशा आजारामुळे निधन झाले. ते माजी पोलीस पाटील होते. त्यांनी शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते म्हणून खंबीरपणे जबाबदारी सांभाळली होती. त्यांच्या निधनाची माहिती चित्रलेखा पाटील यांना समजल्यावर त्यांनी शनिवारी सकाळी सोगाव येथे दिनानाथ पाटील यांच्या घरी जाऊन सांत्वनपर भेट घेतली. यावेळी खरेदी विक्री संघ सदस्य विलास वालेकर, शेकाप तालुका चिटणीस सुरेश घरत, सदस्य संतोष गुरव, कामगार आघाडीचे सदस्य विनोद पाटील, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य नरेश गोंधळी, रुचिता भगत, प्रणय भगत, विजय गायकवाड, सागर गुरव, अमोल नाईक आदी शेकापचे पदाधिकारी, कार्यकर्ते व पाटील कुटुंबीय उपस्थित होते.

Exit mobile version