। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग-मुरुड-रोहा मतदारसंघातील महाविकास आघाडी पूरस्कृत शेकाप उमेदवार चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांनी मतदान केले. चित्रलेखा पाटील यांनी अलिबाग नगर परिषदेच्या केंद्रामध्ये जाऊन मतदानाचा हक्क बजावला. तसेच, रायगड बाजारचे चेअरमन नृपाल पाटील, शेतकरी कामगार पक्ष राज्य महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे आणि माजी नगरसेवक वृषाली ठोसर यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.