चित्रलेखा पाटील नुकसानग्रस्तांच्या मदतीला धावल्या

नेहूली येथील नुकसानग्रस्त नागरिकांची भेट घेऊन दिला आधार

। अलिबाग । प्रतिनिधी ।

रात्रीपासून सुरु असलेल्या पावसामुळे नेहुली गावातील काही घरांमध्ये पाणी शिरले. शेकापच्या महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा नृपाल पाटील उर्फ चिऊताई यांनी सोमवारी नुकसानग्रस्ताच्या घरी जाऊन त्यांची विचारपूस केली. त्यानंतर त्यांना आर्थिक मदतीचा हात दिला. चित्रलेखा पाटील नुकसानग्रस्तांच्या मदतीला धावल्याने त्यांचे सर्वस्तरातून कौतूक करण्यात येत आहे.

1 / 7



अलिबाग तालुक्यातील नेहुली येथील विशाल पाटील, अनिल पाटील, दिलीप पाटील यांच्यासह अनेक ग्रामस्थांच्या घरात पाणी शिरले. तीन ते चार फुट पाणी घरात शिरल्याने घरातील तांदूळ, कपडे, फर्निचर व विद्यूत उपकरणे भिजून गेले. त्यामुळे त्यांचे प्रचंड नुकसान झाले. गावाजवळ आलेल्या पुरामुळे किरण पाटील या शेतकर्‍यांच्या भात पेंढ्याचे प्रचंड नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच शेकापच्या महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी नेहूली येथे जाऊन नुकसानग्रस्तांची भेट घेतली. त्यांची विचारपूस करून त्यांना मदतीचा हात दिला. तात्काळ त्यांनी महसूल विभागातील अधिकार्‍यांशी संपर्क साधून योग्य पंचनामे करण्यात यावे अशी मागणी केली. यावेळी सरपंच नासिकेत कावजी, माजी उपसरंपच विजय थळे, विनोद पाटील, नामदेव पाटील, संतोष पाटील, निवास घरत, बाळकृष्ण पाटील, पंढरीनाथ पाटील, किरण पाटील, श्रेयस पाटील, अ‍ॅड. अशिष बाने, अमोल नाईक आदी पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ व महिला उपस्थित होते.

युवराज पाटील यांनी घेतली नुकसानग्रस्तांची भेट
रात्रीपासून सुरु असलेल्या पावसात रामराज परिसरातील अनेक गावांतील घरांमध्ये पाणी शिरले होते. रामराज, उमटे, बोरघर, आदी गावांना शेकापचे युवा नेतृत्व युवराज पाटील यांनी भेट दिली. भिलजी गावातील माऊली मंदीर, रामराज कोळीवाडा मराठ आळीतील घरांमध्ये पाणी शिरल्याची पाहणी केली. तसेच उमटे येथील अनिल भोईर यांच्या गणपतीच्या कारखान्यात माती, पाणी घुसल्याने नुकसान झाले. तसेच तेथील तळ्याची भिंतदेखील कोसळ्याची पाहणी युवराज पाटील यांनी केली. यावेळी विक्रांत वार्डे, माजी सरपंच मोहन धुमाळ, विश्‍वनाथ झावरे, किफायत पटेल, संतोष झावरे, महेंद्र भोईर, सुरेश पुनकर, धर्मा झावरे, प्रभाकर भगत, मधू धोंगडे, अनिल भोईर, प्रभाकर भगत, महेश झावरे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
Exit mobile version