स्वखर्चातून बोअरवेलची सुविधा
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
कुदे, ता.अलिबाग येथील पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यात शेकाप महिला आघाडीप्रमुख चित्रलेखा पाटील यांना यश आलेले आहे. गावातच बोअरवेलची सोय होऊन डोक्यावरील हंडा उतरल्याने महिलांनीही शेकापला धन्यवाद दिलेले आहेत.
एका स्पर्धेच्या निमित्ताने गावात आलेल्या चित्रलेखा पाटील यांच्याकडे गावातील महिलांनी पिण्याच्या पाण्याची समस्या मांडताच त्यांनी तातडीने कार्यवाही करीत स्वखर्चाने कुदे येथे बोअरवेल मारुन पिण्याच्या पाण्याची समस्या कायमस्वरुपी सोडविली. या योजनेचा नुकताच मान्यवरांच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला. योवळी गुप ग्राम पंचायत सुडकोली सदस्य भारती पाटील, रेणुका घाणेकर, प्रगती महाडीक, लिला गायकर, निर्मला गायकर, दत्ता महाडिक, भाऊ पाटील, मंगेश घाणेकर, मोनेश पवार, शशिकांत पाटील, स्वप्निल पाटील, अरुण पाटील रमेश पाटील, रविद बंधू गोसावी, बाळु वावेकर आदी मान्यवर उपस्थित होते.