माथेरानमध्ये ख्रिसमसची धूम; पर्यटकांची गर्दी

| नेरळ | प्रतिनिधी |

माथेरान मध्ये ख्रिसमससाठी पर्यटकांची संख्या वाढली असून अनेक रिसॉर्ट आणि हॉटेल्स वर पर्यटकांसाठी मनोरंजनाचे कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. अनेक हॉटेल्स रंगीबेरंगी विजेच्या रोषणाईमध्ये माथेरान फुलून उठले आहे.

माथेरान हे ख्रिसमस साठी देखील प्रसिद्ध असून येथील गुलाबी थंडीचा आस्वाद घेण्यासाठी डिसेंबर महिन्यात पर्यटक आवडीने येत असतात. त्यामुळे माथेरान मधील बहुतेक हॉटेल्स मध्ये ख्रिसमस साठी रंगीबेरंगी दिव्यांची रोषणाई आणि जिंगल बेल यांच्या मुखवटे यांची गर्दी हॉटेल्स परिसरात केलेली असते. त्यात माथेरान मध्ये ख्रिसमस साजरा करण्यासाठी येणार्‍या पर्यटकांची क्रेझ लक्षात घेता येथील हॉटेल व्यवसायिक यांच्याकडून देखील विविध कार्यक्रमाचं आयोजन केले जाते. त्यात प्रामुख्याने मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करून पर्यटकांना आपल्याकडे ओढण्याची स्पर्धा असते. यावर्षी माथेरान मध्ये येण्यासाठी ई रिक्षा सुरू झाल्या आहेत आणि त्यामुळे माथेरान वाहन तळ ते रेल्वे स्टेशन असा प्रवास करण्यासाठी पर्यटक यांना ई वाहने उपलब्ध झाली असल्याने पर्यटक देखील मोठ्या संख्येने माथेरान कडे वळले आहेत. आज सायंकाळ पर्यंत क्रिसमस सणाच्या पूर्वसंध्येला दहा हजार पर्यटक आले आहेत.सायंकाळ पर्यंत दस्तुरी येथील प्रवास कर संकलन केंद्रावर पर्यटक रात्री पर्यंत येण्याची शक्यता असून हा आकडा उद्या सकाळ होई पर्यंत 15 हजार पर्यटकांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

माथेरान मधील हॉटेल्स क्रिसमस साठी सजली असून येथील प्रीती हॉटेल, कुमार प्लाझा या ठिकाणी तर विजेच्या रोषणाईने परिसर फुलून गेला आहे. तर प्रीती हॉटेल मध्ये आजच सांता क्लॉज पोहचला असून तेथे पर्यटकांसाठी विविध स्पर्धा आयोजित केल्या आहेत. त्या लहानांसाठी चित्रकला स्पर्धा, मुलांसाठी घोड्यावरून सैर तसेच विविध प्रकारचे केक यांची रेलचेल असून रात्री मायरा पॉइंट येथे कॅम्प फायरच कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून तेथे पर्यटकांना कॉफी ची सोय सुद्धा असणार आहे. तर शहरात रात्री पर्यटकांसाठी प्रत्येक हॉटेल मध्ये डिजे आणि संगीत कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्यामुळे माथेरान क्रिसमस साठी फुलले आहे आणि त्यात पर्यटकांना अनेक सवलती देखील जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पर्यटकांची आपली नोंदनी गेल्या महिंभर आधीच केली आहे.

Exit mobile version