| पनवेल । वार्ताहर ।
खारघर-तळोजा परिसरातील नागरी प्रश्नावरून खारघर-तळोजा कॉलनीज वेल्फेअर असोसिएशन सिडकोविरोधात आक्रमक झाले असून तातडीने प्रलंबित कामे पूर्ण करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
खारघर-तळोजा कॉलनीज वेल्फेअर असोसिएशनच्या संघाने खारघर सिडको चे अधिकारी गिरीश रघुवंशी यांची भेट घेऊन खारघर सेक्टर 26, 35 मध्ये महानगर गॅसने केलेल्या रस्त्यांच्या खोदकामाबाबत जाब विचारला असून, सदर रस्त्यांची दुरुस्ती करून त्वरित रस्ता पूर्ववत न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला. यावर सिडको त्वरित काम करेल, असे आश्वासन सिडकोचे अधिकारी गिरीश रघुवंशी व मंगेश गोंधळी यांनी वेल्फेअर असोसिएशनच्या संघाला दिले. यावेळी खारघर तळोजा कॉलनीज वेल्फेअर असोसिएशनच्या संघाचे मंगेश रानवडे, गिरीश दिवेकर, इम्रान काझी, ज्योती नाडकर्णी उपस्थित होते.