पत्रकारांकडे नागरिकांची धाव

। रसायनी । वार्ताहर ।

पळस्पे येथून जेएनपीटीला जाणार्‍या उड्डाणपुलापासून ते कोनगाव तसेच पनवेलमध्ये प्रवेश करणार्‍या दत्त स्नॅक्स समोरील चौकात दररोज होणार्‍या भयंकर ट्रॅफिकमुळे नागरिक हैराण होत आहेत. या बाबतीत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ जिल्हा उपाध्यक्ष राकेश खराडे यांच्या माध्यमातून जनआंदोलन उभे करावे, यासाठी स्थानिक नागरिकांच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन यावर तोडगा काढावा. तसेच 19ऑगस्टच्या पत्रकार संवाद यात्रेच्या पनवेल दौर्‍यात सदर महत्वपूर्ण मुद्दा उपस्थित करावा, अशी मागणी नागरिकांनी केली.

दररोज प्रवास करणार्‍या लाखो प्रवासी, रुग्ण, चाकरमानी, विद्यार्थी तसेच व्यवसायिक यांना होणार्‍या वाहतूक कोंडीवर आजपर्यंत कुठलाही निर्णय घेत नसल्याने भविष्यातील या त्रासाला पाहता नागरिकांचा रास्ता रोको आंदोलन होण्याच्या मार्गावर आहे. नवी मुंबई एअरपोर्टला जोडणारा पळस्पे येथील उड्डाणपूल ते मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेला जोडणारा ब्रिज बनवावा, अशी मागणी स्थानिक प्रवासी नागरिक करत आहेत.

विमानतळाच्या ठिकाणी मालवाहू ट्रक, ट्रेलर तसेच विमानाने प्रवास करणारे लाखो प्रवासी यांच्या सुरक्षेच्यादृष्टीने राज्य सरकारने रस्ते बांधकाम विभाग यांना निवेदने देऊन भविष्यातील वाहतूक कोंडीवर पर्याय म्हणून नियोजन तसेच आता पर्याय म्हणून रस्त्याच्या बाजूचे अतिक्रमण तोडून रस्ता रुंद करून 365 दिवस व 24 तास वाहतूक नियंत्रण अधिकारी व त्यांची टीम ही टू इन क्रेन, रुग्णवाहिका, अग्निशामक वाहनांसोबत येथे असणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले आहे. पावसाळ्यातील रस्त्यावरील जीवघेणी खड्डे व अनियोजित रस्ते महामार्ग अधिकार्‍यांची बेजबाबदारपणाची ही बाब वाहतूक कोंडीसाठी मोठया प्रमाणात जवाबदार आहे. याबाबत प्रशासन, वाहतुक पोलीस याकडे दुर्लक्ष करत असल्याची बाब नागरिकांनी निर्दशनास आणून दिली. लवकर तोडगा काढावा, अशी मागणी केली आहे.

Exit mobile version