| रसायनी | वार्ताहर |
रसायनी पाताळगंगा अतिरिक्त एमआयडीसी हद्दीत येणार्या चावंढोळी बौद्धवाडा परिसरातील रस्त्याची दुरवस्था झाल्याने तसेच सांडपाणी निचरा करण्यासाठी गटाराची व्यवस्था नसल्याने नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत होते. अखेर शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी आ. मनोहर भोईर यांच्या सहकार्यातून मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण बाह्य रस्ते विकास योजनेंतर्गत चावंढोळी रस्त्याचे काँक्रिटीकरण व गटार बांधकाम या विकासकामाचे काम करण्यात आले. या कामाचे उद्घाटन शुक्रवार (दि.10) मनोहर भोईर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. चावंढोळी येथील रस्त्याचे काँक्रिटीकरण व सांडपाणी निचरा करण्यासाठी गटाराची व्यवस्था झाल्याने मनोहर भोईर यांचे चावंढोळीतील नागरिकांनी आभार मानले.