रिलायन्सच्या कार्यक्षेत्रातील नागरिक लसीकरणापासून वंचित राहणार नाही

। नागोठणे । वार्ताहर ।
रिलायन्स व्यवस्थापनाने आपले कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय, ठेकेदार, कंत्राटी कामगार यांचे लसीकरण करून आपला पहिला टप्पा पूर्ण केला. त्यानंतर इतर काही ग्रामपंचायत हद्दीत ही मोहीम यशस्वीपणे पूर्ण केली.
रिलायन्स कंपनीच्या कार्यक्षेत्रातील एकही नागरिक कोविड प्रतिबंधक लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची काळजी व्यवस्थापनाकडून घेतली जाईल असे स्पष्ट प्रतिपादन रिलायन्स कंपनीचे जनसंपर्क अधिकारी रमेश धनावडे यांनी केले.वरवठणे ग्रामपंचायत हद्दितील 18 वर्षांवरील वयोगटातील लसीकरण रिलायन्सच्या सहकार्याने शुक्रवारी(दि.17) वरवठणे ग्रामपंचायत कार्यालय व प्राथमिक शाळेत सुरु करण्यात आले यावेळी बोलत होते.
यावेळी तानाजी नारनवर,रमेश धनावडे,ॠतुजा म्हात्रे,विजय पाटील,गणपत म्हात्रे, रेवती पाटील,पुष्पा म्हात्रे, रोशन दाभाडे,बापजी पवार,सुरेखा म्हात्रे,ॠतुजा करजेकर,डॉ. प्रशांत बरदोलीया, डॉ.भानुप्रताप दुबे, डॉ. प्रितेश मोहन, डॉ. सुशांत जाधव, डॉ. गजानन ससाणे, जनार्दन मुंडे,देवता भंडारे, दिनेश चौधरी, ललिता गायकवाड, मेघा दाहत, मेघना भोईर, सोनाली जाधव,निकिता काळे, शुभम जमदाडे आदींसह ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

Exit mobile version