ग्रामपंचायत बंदीमुळे नागरिकांची गैरसोय

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

| म्हसळा | प्रतिनिधी |

म्हसळा तालुक्यातील खारगाव खुर्द ग्रामपंचायत कार्यालय गेल्या 21 दिवसांपासून बंद असल्याने स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दि.5 मार्च रोजी ग्रामपंचायत प्रशासक व ग्रामसेवक यांच्या भ्रष्टाचार प्रकरणी कारवाई केल्यानंतर हे कार्यालय बंद ठेवण्यात आले आहे. मात्र, या कारवाईनंतर आजपर्यंत ग्रामपंचायत कार्यालय सुरू करण्यात आलेले नसल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे असल्यामुळे नागरिकांना विविध शासकीय कामांसाठी अडथळे येत आहेत. विशेषतः पाणीपुरवठा, जन्म-मृत्यू नोंद दाखले, रहिवासी प्रमाणपत्र यांसारख्या अत्यावश्यक सेवांमध्ये मोठा खोळंबा होत आहे. याबाबत स्थानिकांनी माहिती देताना कार्यालय उघडण्यासाठी आवश्यक चावी उपलब्ध नसल्याचे गटविकास अधिकारी सांगत आहेत. त्यामुळे भ्रष्टाचार अधिकाऱ्यांनी केला आणि त्याचे परिणाम सामान्य नागरिकांनी का भोगायचे, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

Exit mobile version