पाचाड येथे लसीकरणाला नागरिकांचा प्रतिसाद

महाड | प्रतिनीधी |
तालुक्यातील पाचाड आरोग्य केंद्रामध्ये लसीकरणाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असल्याचे तेथील वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितले. नागरिकांमध्ये लसीबाबत जनजागृती झाली असल्याने नागरिक स्वतःहून लसीसाठी येत आहेत.

आजपर्यंत या पाचाड प्राथमिक आरोग्य केंद्रामधून कोव्हिशिल्डचा 2 हजार 477 पहिला डोस देण्यात आला आहे, तर दुसरा डोस 77 लोकांना देण्यात आला आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उप केंद्र नाते येथे दोन दिवसांचा कॅम्प घेउन लसीकरण करण्यात आले आहे, तर आचलोली, करमर व सावरट या गावांमध्ये एक दिवसाचा कॅम्प लावण्यात आला होता. त्याचप्रमाणे बावळे व सांदोशी येथे एक दिवस कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते.

पावसाळ्याच्या दिवसात पाचाड खोर्‍यातील अनेक गावांत जाणे-येणे शक्य नसल्याने त्या लांब असलेल्या गावात प्रथम कॅम्प लावून नागरिकांचे लसीकरण करण्यात आले, अशी माहिती डॉ. बेरलीकर यांनी प्रस्तुत प्रतिनिधी याच्याशी बोलताना दिली.

या लसीकरण मोहिमेत पाचाड आरोग्य केंद्रामधील वैद्यकीय अधिकारी डॉ. पद्मिनी बेरलीकर, सृष्टी शेळके, सी.आर. शेळके, आरोग्यसेविक सना मुनावर, सुरक्षा रक्षक दिगंबर खैरकर, वाहन चालक अनंत औकिरकर, शिपाई संदेश बावदाने आदी कर्मचारी लसीकरणबाबत नागरिकांना सहकार्य करत आहेत.

Exit mobile version