बाजारपेठेत पारंपरिक कंदिलांसह मातीच्या पणत्याकडे नागरिकांचा कल

Colorful Diwali Kandils for sale at Ranade Road, Dadar on Thursday. Express photo by Dilip Kagda, Mumbai 051115

| पनवेल । वार्ताहर ।
पनवेल परिसरातील बाजारपेठांमध्ये लागला असून दिवाळीच्या वस्तूंनी बाजारपेठ्या सजल्या आहेत. दिवाळी पंधरवड्यावर येऊन ठेपली असताना निरनिराळ्या रंगाच्या पणत्या, रांगोळ्या, आकाश कंदील, फटाके, सुगंधी उटणे, तसेच विद्युत रोषणाईची तोरणे आणि फराळाच्या पदार्थांनी बाजारपेठा सजल्या आहेत. या वस्तूंच्या खरेदीसाठी ग्राहकांनी बाजारपेठेत गर्दी केली आहे.

पारंपरिक मातीच्या पणत्याबरोबर चिनी मातीच्या डिझायनर पणत्या बाजारपेठेत दाखल मातीच्या पणत्याऐवजी पारंपरिक मातीच्या आणि डिझायनर पणत्या घेण्याकडे नागरिकांचा कल अधिक असल्याचे दिसून येत आहे. बाजारात मातीच्या पणत्या 25 ते 30 रुपये डझन तर चिनी मातीच्या पणत्या 40 ते 60 रुपये डझन आहेत. याशिवाय डेकोरेटिव्ह पणत्याही बाजारात उपलब्ध असून 20 रुपयांना दोन या दरात उपलब्ध आहेत. बाजारामध्ये रांगोळ्या काढण्यासाठी विविध डिझाइनच्या गोल आकारच्या जाळी विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये मोर, पावलं, देवी-देवता, फुलं, वेली अशा अनेक प्रकारच्या डिझाइन उपलब्ध आहेत. याची किंमत 20 ते 40 रुपयांपर्यंत आहे.

पारंपरिक रांगोळ्यांची मागणी फारशी कमी झाली नसली तरी गृहिणींकडून रांगोळ्या उपलब्ध असून शुभ चिन्हांच्या स्टिकर्सचा समावेश आहे. या शिवाय ठिपक्यांच्या रांगोळीच्या डिझाइनचे स्टिकर, संस्कारभारती रांगोळीचे स्टिकर्सही उपलब्ध आहेत. बाजारात पारंपरिक आकाश कंदिलाबरोबर चायना मेड आकाशकंदीलही विक्रीसाठी आले आहेत. मात्र देशी बनावटीचे आकर्षक कंदील घेण्याकडचे लोकांचा कल असल्याचे दिसून येत आहे. प्लास्टिकचे कागदी मिश्र रंगाचे कंदील बाजारात दिसून येतात. प्लास्टिकचे साधे कंदील 50 रुपयांपासून आहे. तर चायना कंदील 150 रुपयांपासून किमती आहेत. फिरकी, चांदणी, झालर आदी प्रकारामध्ये कंदील पाहायला मिळत आहेत.

Exit mobile version