नागरी संरक्षण दलाच्या प्रशिक्षण प्रतिसाद

| उरण | वार्ताहर |

नागरी संरक्षण वैद्यकीय अधीक्षक दलाचे सा.उपनियंत्रक एम.के.म्हात्रे माध्यमातून उरणमधील तरुण वर्गासाठी प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात पाच दिवस प्रशिक्षणार्थींनी उपस्थित राहून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. सदर शिबिराचे उद्घाटन उरण इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.बाबासो काळेल यांच्या हस्ते करण्यात आले. तर शिबिराची सांगता उरण पोलीस ठाण्याचे गुन्हे विभागाचे सूर्यकांत कांबळे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी डॉ. स्त्या ठाकरे, प्रा. आमोद ठक्कर, प्रदीप पाटील, संजय गायकवाड, विलास पाटील, शिरसाठ आदी उपस्थित होते.

या शिबिरात प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहून याचा लाभ घेतला. तसेच पुढील शिक्षणासाठी ही संधी उपलब्ध नागरी संरक्षण दलाच्या माध्यमातून उपलब्ध आहेत. त्याचा लाभ तरुणांनी घेतला तर त्यांना नोकरीसाठी याचा नक्कीच फायदा होईल असा विश्वास नागरी संरक्षण दलाचे सा.उपनियंत्रक एम.के.म्हात्रे यांनी दिली. तसेच सांगता समारंभात उरण पोलीस ठाण्याचे गुन्हे विभागाचे प्रमुख सूर्यकांत कांबळे यांनी आपण नागरी संरक्षण दलाचे प्रशिक्षण घेऊन सुरुवात केली आहे. त्याचा उपयोग तुम्हांला नोकरी मिळविण्यासाठी अथवा आपत्कालीन घटनेत आपल्या बरोबर इतरांचे संरक्षण कशा प्रकारे करायचे याचे प्रशिक्षण मिळते म्हणून हे प्रशिक्षण प्रत्येकाने घेणे आवश्यक असल्याचे सांगितले.

Exit mobile version