धमकी देणारी दहशतवादी संघटना पाकिस्तानात


| न्यूयॉर्क | वृत्तसंस्था |

टी-20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील भारत-पाकिस्तान या लढतीस इस्लामिक स्टेट-खोरासन ही दहशतवादी संघटना लक्ष्य करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. सुरुवातीस अमेरिकेतील विश्वचषक लढती लक्ष्य करणार असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणेस मिळाली होती. मात्र, आता थेट भारत-पाक लढतच लक्ष्य असल्याचे स्पष्ट झाले आहे.

इस्लामिक स्टेट-खोरासन 2015मध्ये स्थापना करण्यात आली. अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि इराणमध्ये प्रामुख्याने कार्यरत ही संघटना कार्यरत आहे. ही संघटना आयएसची शाखा आहे. प्रामुख्याने दहशतवादी हल्ले करण्याचे काम ही संघटना करते. इस्लामिक स्टेट-खोरासन (आयएस-के) आणि आयएस यांच्यातील नेमके संबंध अस्पष्ट आहेत. 2018मध्ये आयएस-के ही चौथ्या क्रमांकाची दहशतवादी संघटना असल्याचा इकॉनॉमिक्स अँड पीस संघटनेचा दावा आहे.

न्यूयॉर्क प्रांतातील नासाऊ येथे विश्वचषक लढतीसाठी मैदानाची उभारणी करण्यात आली आहे. विश्वचषकाला धोका असल्याची धमकी प्रथम एप्रिलमध्ये देण्यात आली होती. आता एक व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारीत होत आहे. त्यात भारत-पाक लढत लक्ष्य असल्याचे सुचीत होत आहे. नासाऊ काउंटीचे पोलिस आयुक्त पॅट्रिक जे रायडर यांनी याबाबत माहिती दिली. भारत-पाक लढत एल्सेनहोवर पार्कमधील नासाऊ काउंटी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.

भारत-पाक लढत ही सुपर बाऊलसारखीच आहे. या विश्वचषकाच्या निमित्ताने जगातील संघ येत आहेत. सर्व जगातून क्रिकेटचे चाहते येणार आहेत. आम्ही सहा महिन्यांपासून या लढतींसाठी तयारी करीत आहोत. त्याबाबत सुरक्षा; तसेच आरोग्य यंत्रणेसह चर्चा सुरू आहे, असे नासाऊ काउंटीचे ब्रूस ब्लॅकमन यांनी सांगितले. न्यूयॉर्कमध्ये विश्वचषकाच्या आठ लढती होतील. त्यात भारताचे तीन सामने आहेत.

Exit mobile version