आवासमध्ये दोन गटात हाणामारी

बारापेक्षा अधिक जणांविरोधात गुन्हा दाखल

| अलिबाग | प्रतिनिधी |

अलिबाग तालुक्यातील आवास येथे शुक्रवारी सकाळी दोन गटात हाणामारी झाली. याप्रकरणी मांडवा सागरी पोलीस ठाण्यात बारापेक्षा अधिक जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मटेरिलचे काम देण्याघेण्यावरून हा वाद झाल्याची माहिती मांडवा सागरी पोलिसांनी दिली.

तुडाळ येथील परमानंद सिंह हे ठेकेदार असून प्रशांत राऊळ हे बांधकामाचे माल वितरीत करणारे आहेत. राऊळ यांनी शुक्रवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास आवास येथे जाऊन परमानंद सिंह यांना बांधकामाचे साहित्य वितरीत करण्याचे काम देण्याबाबत विचारणा केली. त्यावेळी दोघांमध्ये शाब्दिक वाद झाले. हा वाद विकोपाला पोहचला. एकमेकांविरोधात हाणामारी झाली. यामध्ये दोन्ही गटातील मंडळी जखमी झाली. याप्रकरणी परमानंद सिंह, प्रशांत राऊळ यांच्यासह 12 पेक्षा अधिक जणांविरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक सुमित खोत करीत आहेत.

Exit mobile version