कर्जत तालुक्यात दोन गटामध्ये हाणामारी

। नेरळ । प्रतिनिधी ।

कर्जत तालुक्यातील मांडवणे गावातील, मोडक आळी येथील एका रहिवाशी महिलेचा मुलगा दारू पिऊन घरी परतल्याची टिप्पणी केल्यानंतर झालेल्या शाब्दिक वादातून लोखंडी सळीने मारहाणीची घटना घडली.

कर्जत पोलीस ठाणे हद्दीत मौजे तक्रारदार याचे घरी मौजे मोडक आळी येथील महिला आपल्या मुलाला ‘आला बघ दारू पिऊन मेला’ असे बोलल्या. त्यावेळी समोरची व्यक्ती मला विनाकारण शिवीगाळ का करत आहेस? असे बोलले असता तेथे उभे असलेले आरोपी एक यांनी आपल्या उजव्या हातामध्ये लोखंडी सळी आणि डाव्या हातामध्ये दगड घेऊन उजव्या हातामधील लोखंडी सळीने तक्रारदार यांच्या डोक्यामध्ये प्रहार केला. त्यावेळी तक्रारदार यांचा मुलगा हा त्याचे भांडण सोडविण्यासाठी आला म्हणून आरोपी एक यांनी तक्रारदार यांच्या मुलाच्या तोडावर डाव्या हातामघील दगडाने मारून दुखापत केली. त्यावेळी येथे उपस्थित असलेल्या अन्य तिघांनी संगनमत करून तक्रारदार आणि त्याचा मुलगा याच्या खांद्यावर, पायावर दगड फेकुन मारून दुखापत केली. तसेच तक्रारदार यांच्या घराच्या खिंडक्यावर दगड मारून खिडकीच्या काचा फोडून नुकसान केले. याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलीस हवालदार तोरवे हे करीत आहेत.

Exit mobile version