रोडेच्या उपसरपंचाला मारहाण
| पेण | प्रतिनिधी |
पेण तालुक्यातील शिंदे गट आणि ठाकरे गटात आता रस्त्यावरच हाणामारीचे प्रकार सुरु झालेले आहेत. रोडेचे उपसरपंच नरेश सोनावणे यांना मारहाण करण्याची घटना घडल्याने वातावरण तंग बनले.
पेण पंचायत समिती कार्यालयामध्ये सुरू असणार्या प्रशिक्षण शिबिरामधून बोलवून रोडे उपसरपंच नरेश नथुराम सोनावणे याला लाथाबुक्याने मारून त्याला जातीवाचक शिव्या दिल्याचा प्रकार घडला आहे. नरेश सोनावणे हे ठाकरे गट सेनेचे रोडे गावचे उपसरपंच आहेत. तर राहुल पाटील हे शिंदे गट सेनेचे विधान सभा संघटक आहेत.
नरेश नथुराम सोनावणे हे पेण पंचायत समिती कार्यालयात प्रशिक्षण शिबिरामध्ये हजर होते. त्यावेळी राहुल यांनी त्याला फोन लावून त्याला विचारण केली की तु कुठे आहेस, मला भेटाच आहे आणि 4 च्या सुमारास राहुल पाटील आपल्या इतर चार सहकार्यासोबत पेण पंचायत समिती येथे पोहोचला आणि त्यानी नरेश सोनावणे याला प्रशिक्षणातून बाहेर बोलावून घेत अरुण पाटील यांच्या सेवा निवृत्तीच्या विषयाला सुचक म्हणून तुझे नाव का आणि नंतर त्यानी त्याला मारहाण सुरू केली. त्याला लाथाबुक्याने मारले. तर गोरख पाटील यांनी नरेश याला जातीवाचक शिवीगाळ करून आमच्या माणसाला कामावरून काढण्याची आणि पुन्हा त्याला मारहाण करत त्याला पुन्हा पंचायत समितीच्या मुख्य प्रवेशद्वारा पर्यंत आणले. त्यानंतर नरेश यांनी पेण पोलीस ठाणे गाठून तक्रार पोलीसांपुढे मांडली.
या संदर्भात पेण ठाण्यात भा.द.वि.क. 143, 147, 149, 323, 504, 506, सह अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989 चे कलम 3 (1) (आर) (एस) 3 (2) (व्हीए) प्रमाणे गुन्हा दाखल केला असून सदर गुन्हयाचे तपास उपविभागीय पोलीस अधिकारी पेण हे करत आहेत.