दादरमध्ये जंगी मिरवणूक
| पेण । प्रतिनिधी ।
गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात वेगळी चर्चा होती की, शेतकरी कामगार पक्षाचे नेते पक्ष सोडून गेल्यामुळे पक्ष संपला. भरती ओहोटी नेहमीच येत असते. माणसं पक्ष बदलतात पण पक्षाचे विचार बदलता येत नाहीत. त्यामुळे कोणी पक्षातुन गेल्याने पक्ष संपत नसतो. जे गेले त्यांचा विचार न करता पुढे जायचे आहे. शेकाप संपला नाही हे दाखवून देण्याची वेळ आली आहे. बचेंगे तो और भी लडेंगे. शेतकरी कामगार पक्षाच्या इतिहासात अनेक लोक पक्ष सोडून गेले. परंतू कार्यकर्त्यानी कधी लालबावटा खाली ठेवला नाही. दादरकरांनी शेकाप संपला नसल्याचे दाखवून दिले आहे, असे सडेतोड प्रतिपादन शेकाप नेते पंडित पाटील यांनी केले.

माजी आ. धैर्यशील पाटील यांनी कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला होता. या राजकीय घडामोडीत पेणमधील निष्ठावंत कार्यकर्त्यांत संभ्रम निर्माण झाला होता. कार्यकर्त्यांना पक्षाची भूमिका स्पष्ट होऊन नवी मिळावी यासाठी हमरापूर विभागापासून आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याअनुषंगाने दादर, जोहे व हमरापूर येथे आढावा बैठक घेण्यात आल्या. यावेळी दादर गावातून माजी आ. पंडित पाटील, जिल्हा चिटणीसी अॅड. आस्वाद पाटील, अलिबाग अर्बन बँक चेअरमन सुप्रिया पाटील, स्मिता पाटील व इतरांचे रॅली काढून फटाक्यांची आतषबाजी करीत स्वागत करण्यात आले.
यावेळी माजी आमदार पंडितशेठ पाटील, सुप्रियाताई पाटील, युवा नेते ऍड. आस्वाद पाटील, स्मिता प्रमोद पाटील, भावना पाटील, सुरेश खैरे, खालापूर उपनगराध्यक्ष संतोष जंगम, प. स. उपसभापती तैलेश पाटील, दादर सरपंच तेजस्वीनी म्हात्रे, संतोष म्हात्रे, विनोद पाटील, सचिन पाटील, कुंदा गावंड, मंगल पाटील, भास्कर पाटील, दीपक पाटील, नरदास पाटील, गजानन घासे यांच्यासह दादर ग्रामपंचायत उपसरपंच, सदस्य यांच्यासह मोठ्यासंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. उपस्थितांसमोर बोलताना पंडित पाटील यांनी कुणी गेले म्हणून कधी खचत नसतो. उलट जे निष्ठावंत आहेत तेच हा पक्ष नव्या जोमाने वाढवितील असा विश्वासही व्यक्त केला. मी आमदारकीला पडलो तेव्हा दुःख झाले नव्हते ते दुःख यांच्या जाण्याने झाले. कारण पेणमध्ये 2009 मध्ये जयंत पाटील यांनी वेगळे राजकारण केले होते. त्यामुळेच आमदार झाले. हा डाव्या विचारसरणीचा जिल्हा आहे. जयंत पाटील नेतृत्वाखाली शेतकरी कामगार पक्ष रायगड जिल्ह्यामध्ये आगामी काळामध्ये निश्चित महत्वाची भूमिका बजावेल याची खात्री आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
भारतीय जनता पक्ष वेगवेगळी प्रलोभने दाखवून कार्यकर्ते आयात करत आहेत. परंतू एवढे निश्चित आजपर्यंतचा इतिहास आहे शेकापक्षाच्या मदतीशिवाय रायगडचा खासदार होणे शक्य नाही, असेही त्यांनी निक्षून सांगितले.
यावेळी आस्वाद पाटील यांनी दादर गावातील लोक पेण तालुक्यात पसरले आहेत. त्यामुळे गेले तर कार्यकर्ते पक्षा सोबत असल्याचे दाखवून दिले आहे. जि. प. सदस्य निवडून आणण्याची किंवा पाडण्याची ताकद दादर गावात आहे. त्यामुळे दादर गावातून सुरुवात केली. 2 ऑगस्ट रोजी वडखळ येथे वर्धापनदिनी माझे भाषण झाल्यानंतर काहींनी बाकडे आपटले होते. त्यावेळीच आम्हाला कल्पना आली होती. पक्ष संघटना वाढविण्यासाठी काही निर्णय घ्यावे लागतात. लोकांमधील संभ्रम दूर करण्यासाठी लवकरच पेण तालुक्याची मीटिंग घेतली जाईल. तसेच येत्या काळात नवीन पक्ष कार्यालय होईल, असे सांगितले.
यावेळी सुरेश खैरे यांनी, पेण मतदार संघात दोन दिवसापूर्वी राजकीय घडामोडी झाल्या त्यामुळे जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्या कार्यकारिणीची मिटिंग होऊन पेण मतदारसंघात पक्षाचे किती नुकसान झाले याचा आढावा घेण्यासाठी तालुक्यात बैठक घेण्यात येतील असे सांगितले.
कोणाच्या जाण्याने नुकसान होऊ देणार नाही. श्रमजीवी, कष्टकरी आणि शेतकर्यांचा हा पक्ष असून नव्याने उभारी घेणार. या रायगड जिल्ह्यामध्ये स्वातंत्र्याच्या स्थापनेपासून लालबावटा डौलाने फडकत आहे. तो असाच फडकत राहील याची खात्री आजच्या सभेने मिळाली. तालुक्यात शेकाप वाढविण्यासाठी खरे योगदान दिनेशशेठ पाटील यांचे नव्याने उभारी घेणार. भविष्यामध्ये प्रत्येक विभागवार बैठका घेऊन जनतेचे मत आजमावणार. पंडित शेठ नामही काफी आहे. त्यामुळे पोलिसांची भीती बाळगू नका.
पंडित पाटील, शेकाप नेते
लालबावट्याचीच मदत लागणार
रायगडमध्ये खासदार होण्यासाठी शेकापचीच मदत घ्यावी लागेल. कोणाच्या जाण्याने नुकसान होऊ देणार नाही. श्रमजीवी आणि शेतकर्यांचा हा पक्ष असून नव्याने उभारी या जिल्ह्यामध्ये स्वातंत्र्याच्या स्थापनेपासून लालबावटा डौलाने फडकत आहे. तो असाच फडकत राहील याची खात्री आजच्या सभेने मिळाली असा विश्वास शेकाप माजी आ. पंडित पाटील यांनी दादर येथे कार्यकर्तांना मार्गदर्शन करताना व्यक्त केला.
जे गेले ते गेले. आपण नव्याने सुरुवात करू. एकनिष्ठ राहुन पक्ष संघटना वाढवण्यासाठी प्रयत्न करा. शेकापच्या नेत्यांनी येऊन उभारी दिली त्यामुळे आम्ही पक्षासोबत खंबीरपणे उभे राहणार ,असा विश्वास ग्रामस्थांनी दिलेला आहे.
स्मीता पाटील (पिंट्याशेठ यांची पत्नी)