। अलिबाग । शहर प्रतिनिधी ।
आपण अलिबागकर निसर्गाच्या सानिध्यात राहिल्याबद्दल जितके कृतज्ञ आहोत तितकेच हे क्षेत्र स्वच्छ ठेवणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. या विचारातुन प्रियांका सावंत आणि सुरभी मोरे या दोन तरुणींनी त्यांच्या नेतृत्वाखाली अलिबागमध्ये बीच क्लीनअप मोहीम शनिवारी (दि. 12) रोजी सकाळी राबवली. आपण ज्या वातावरणात श्वास घेतो आणि राहतो ते निरोगी आणि स्वच्छ असायला हवे हा मानस घेऊन ही स्वच्छता मोहीम राबल्याचे त्यांनी सांगतले. पुढे अलिबागमध्ये अजून अश्या मोहीम राबवण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. अलिबागचे तरुण पवन एन. घरत, श्रेया ठाकूर आणि मृणाल वाकडीकर, तसेच कलाकार प्रिती थळे (शाईपेन आर्ट), शिक्षिका आणि करिअर समुपदेशक धनश्री खानविलकर, इन्स्ट्रुमेंट इंजिनीअर अनिकेत कदम, इव्हेंट मॅनेजर आणि प्रोडक्ट इंजिनीअर आकाश राजदेकर यांचाही सहभाग होता. ज्येष्ठ वकील जयेश जोशी, सचिन बारवेकर आणि अलिबागमधील काही रहिवासी या साफसफाईमध्ये सहभागी झाले होते.
प्रियांका, सुरभीच्या नेतृत्वाखाली अलिबागमध्ये स्वच्छता मोहीम
