डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याची स्वच्छता

। चिपळूण प्रतिनिधी ।
नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे चिपळूण परिसर पुर्णपणे जलमय झाला होता यामुळे बहादुरशेख येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्ण आकृती पुतळ्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले होते.आ.शेखर निकम, माजी सभापती सूर्यकांत खेतले यांच्या नेतृत्वाखालील मुंढे गावचे सरपंच मयुर खेतले यांच्या मार्गदर्शनाखाली तरुणांनी बहादुरशेख येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची व परिसरातील स्वच्छता करण्याचे काम पुर्ण करण्यात आले.

आ. निकम याचे चिरंजीव अनिरुद्ध निकम यांच्या उपस्थितीत या स्वच्छता मोहिमेची सुरुवात करण्यात आली. यावेळी मोजस कंपनीचे जावेदभाई व कर्मचारी यासह राजु जाधव, राम राजेशिर्के, योगेश सुतार,श्याम खेतले, विराज कदम, अक्षय गमरे, रुपेश खेतले, रोहित गमरे इत्यादी यावेळी सहभागी झाले होते.

Exit mobile version