वेनगाव ग्रामपंचायतीतर्फे गटारांची सफाई

| वेनगाव | प्रतिनिधी |

नागरिकांचा आरोग्य सुदृढ व निरोगी राहण्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावातील गटारे व पिण्याच्या पाण्याच्या टाक्या साफ करण्याचा वेनगाव ग्रामपंचायतीने उपक्रम हाती घेतला आहे. पावसाचे पाणी साचू नये, व कोणतीही प्रकारची रोगराई पसरु नये यासाठी गावातील गटारे साफ करून त्यातील साचलेला झाडांचा पालापाचोळा काढून गावातील गटारे स्वच्छ करम्यात आली आहेत. तसेच मोठे वेनगाव बौद्ध वस्तीतील पिण्याच्या पाण्याची टाकी जंतुनाशक औषध टाकून साफ करण्यात आली आहे. गावातील ग्रामस्थांचे आरोग्य स्वच्छ राखण्यासाठी सदर उपक्रमाच्या माध्यमातून वेनगाव ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, सदस्य यांच्या संयोगाने कामांना सुरुवात करण्यात आली आहे.

Exit mobile version