जेजुरी मल्हार गडाची दुर्गरक्षकांकडून स्वच्छता

। माथेरान । वार्ताहर ।
महाराष्ट्रातील गडकोट किल्ले पर्यटन स्थळ बनले आहेत असले तरी त्यांचे संवर्धन आवश्यक आहे. याच विचारातून दुर्ग रक्षक फोर्स महाराष्ट्राच्या कार्यकर्त्यांनी गडकिल्ले स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. त्याअंतर्गत जेजुरी आषाढी वारी वारकरी दिंडीचे औचित्य साधून जेजुरी मल्हार गड येथे स्वच्छता करण्यात आली.
माझा गड, माझा अभिमान मोहिमेंतर्गत गडावरील प्लास्टिक बाटल्या, खाऊचे पुडे, कचरा गोळा करून स्वच्छता करण्यात आली. या मोहिमेतून कचर्‍याच्या 22 बॅग जमा करण्यात आल्या.
दुर्ग रक्षक फोर्स महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष जयकांत शिंक्रे, वर्षा चासकर, अशोक खांडेकर, आरती सुलगेवार, जानवी एडवणकर, अमृता काशिद, योगेश अशोक गायकवाड, स्वाती मोरे, सचिन वाघ पाटील, यश खंदारे, अविष्कार यादव, गोविंद सूर्यवंशी, अमित पवार, स्वप्नाली वारंगे, युवराज पाटील, राजेंद्र पोतदार, अतिश मोहिते, पूनम मोहिते, त्रिशा मोहिते, विकास लोहोट, अखिलेश वारंगे, अपर्णा वारंगे, अनंत वारंगे, साक्षी चव्हाण यांच्यासह 24 कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला.

Exit mobile version