आपटा कोळीवाड्यातील तळावाची स्वच्छता

। रसायनी । वार्ताहर
आधार सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून नेहमी छोट्या मोठ्या समाजोउपयोगी उपक्रम राबविले जातात. त्याचा एक भाग म्हणून रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आपटा नवीन कोळिवाड्यातील तळाव हे गेल्या 30 वर्षांपासून केर कचरा दुर्गंधीयुक्त घाण व सापांचे वस्तीस्थान होते. त्यामुळे दरवर्षी रोगराईचे कारण होत असे म्हणून आधार सामाजिक बहुउद्देशीय संस्थेमार्फत तळावाचे साफसफाईचे काम करण्यात आले.तळयामधील गाळ जेसीबीच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आला. यासाठी आपटा कोळीवाड्यातील गणेश भोईर, नरेश शेलार, केशव शेलार यांनी श्रमदान केले. तर यावेळी आधार सामाजिक संस्थेला मदत करणारे मयुर शेलार, निकिता भोईर आणि कोळी वाड्यातील वरीष्ठ लोकांनी आणि आपटा ग्रामपंचायत यांनी मदतीचा हातभार लावला. आपटा कोळीवाड्यातील या तळावाची कायमची स्वच्छता कशी राहिल तसेच तलावाला सुशोभीकरण करण्यासाठी होणारे प्रयत्न आधार सामाजिक बहुउद्देशीय संस्थेसह आम्ही कोळीबांधव घेणार असल्याचे शेलार यांनी सांगितले.

Exit mobile version