मनसेकडून पिरवाडी समुद्रकिनार्‍याची स्वच्छता

| उरण | वार्ताहर |

दहा दिवसांच्या बाप्पाला मोठ्या भक्तिभावाने निरोप दिल्यानंतर उरण पिरवाडी समुद्र किनारपट्टीवर जो केरकचरा निर्माण झाला होता, तो केरकचरा मनसे नेते अमित ठाकरे यांच्या संकल्पनेतून ‘आपला समुद्रकिनारा, आपली जबाबदारी’ या मोहिमेत सहभाग घेऊन उरण व पनवेल तालुक्यातील मनसेच्या पदाधिकार्‍यांनी व कार्यकर्त्यांनी शनिवारी (दि. 10) स्वच्छ केला आहे.

मनसे जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पिरवाडी समुद्र किनार्‍यावर सकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत स्वच्छता अभियान राबविण्यात आली. यावेळी जिल्हा सचिव अविनाश पडवळ, जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण दळवी, उरण तालुका अध्यक्ष सत्यवान भगत, सचिव अल्पेश कडू, पनवेल तालुकाध्यक्ष रामदास पाटील, उरण उप शहराध्यक्ष संजय मुरकुटे, उरण शहराध्यक्ष धनंजय भोरे, तालुका उपाध्यक्ष राकेश भोईर, दीपक पाटील, विभाग अध्यक्ष बबन ठाकूर, गणेश तांडेल सह मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version