| पाताळगंगा | प्रतिनिधी |
खोपोली नगरपालिका हाद्दीत असलेल्या लव्हेज गावातील तरुण व महिला वर्ग स्वच्छता जनजागृती मोहीमेत सहभागी झाले होते. यावेळी आपल्या घरातील निघणारा ओला-सुखा कचरा कोठेही न टाकता घंटा गाडीमध्ये टाका म्हणजे आपला परिसर स्वच्छ राहिल. यामुळे कोणत्याही प्रकाराचे आजार निर्माण होणार नाही. यासाठी नगरपालिका शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करा. याबाबत विविध ठिकाणी जात लोकांमध्ये स्वच्छतेचे महत्व समजावून सांगण्यात आले. पावसाचे अगमन झाल्यामुळे अनेक ठिकाणी डासांचा प्रादुर्भाव निर्माण होत असतो. कारण ज्या ठिकाणी अनेक दिवस एकाच ठिकाणी पाणी राहते त्या ठिकाणी डासांची निर्मिती होत असते. यामुळे आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळा. त्यामुळे डासांच्या निर्मितीला आळ बसेल आणि घरातील कुटुंबांना आजारपणांचा सामना करावा लागणार नाही. ज्या ठिकाणी स्वच्छता असते त्या ठिकाणी रोगराई पसरत नाही. या उद्दांत विचारांतून लव्हेज ग्रामस्थांनी विविध ठिकाणी जावून ग्रामस्थांमध्ये जनजागृती केली.