अवचित गडावर स्वच्छता मोहीम

| खांब-रोहा | वार्ताहर |

शिवशंभू प्रतिष्ठानच्या मावळ्यांनी श्रमदान करून व अखंड गड संवर्धन मोहिमेंतर्गत अवचितगड संवर्धन मोहिम मोठ्या उत्साहात पार पाडली.

या मोहिमेत एकूण 45 शिवभक्तांनी व शिवशंभु प्रतिष्ठानच्या मावळ्यांनी श्रमदान करून अवचित गड बालेकिल्ला, गडावरील मुख्य सदर व महादरवाजावरील वाढलेली झाडे साफ करण्यात आली. अवचित गड या बालेकिल्लाची खुपच दुरवस्था अवस्था झाली होती या बालेकिल्ल्यात काटेरी झुडपे वाढले होती. सर्वत्र गवत वाढलेलं होते. काटेरी झुडपं गवत साफ केल्याने येथे येणार्‍या पर्यटकांना आता अवचितगडाचा बालेकिल्ला पाहता येणार असल्र्याचे मोहिमेतील सहभागी शिवभक्तांनी सांगितले. तसेच अवचितगडा वरील महाद्वारावर बाजूला वाढलेले गवत व झुडपे उत्तमरित्या साफ करण्यात आले. तसेच गडावरील ऐतिहासिक सदरीला गतवैभव प्राप्त होण्यासाठी तेथील विस्कळित चिरे एकत्र करून साफसफाईचे काम चालू केले आहे. येत्या मोहिमेअंतर्गत हे सुद्धा काम पूर्ण होईल असे सांगितले आहे.

29 जानेवारी 2023 रोजी अवचित गड अभ्यास मोहीम होणार आहे. शिवशंभु प्रतिष्ठान रोहा मार्फत अभ्यास मोहीम क्रमांक दोन ही सुद्धा मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. आपल्या रोह्याच्या आणि प्रतिष्ठानच्या हक्काच्या दुसर्‍या घराचा इतिहास उलगडणार असल्याचे सांगतानाच या अभ्यास मोहिमेसाठी जास्तीत जास्त शिवप्रेमींनी, इतिहास प्रेमींनी या मोहिमेत सहभाग घेऊन अवचितगडाचा इतिहास व आपल्या रोह्याचा इतिहास जाणून घ्यावा. असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष विशाल तेलंगे यांनी केलेले आहे.

Exit mobile version