चिरनेर गावात स्वच्छता अभियान

धन निरंकारी मिशनचा स्तुत्य उपक्रम

| उरण | वार्ताहर |

उरण तालुका धन निरंकारी मिशन अंतर्गत ऐतिहासिक प्रसिद्ध चिरनेर गावातील सोरला तलाव येथे अमृत स्वच्छ जल स्वच्छ मन माध्यमातून स्वच्छता अभियान रविवारी (दि. 25) राबविण्यात आले. या अभियानाचे उद्घाटन चिरनेर गावचे सरपंच भास्कर मोकल, उपसरपंच सचिन घबाडी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सेवा दल अधिकारी दत्ता पाटील, सेवा दल अधिकारी संचालक रवींद्र मढवी, महिला अधिकारी नीलम मुंबईकर, मीनाक्षी ठाकूर, वामन म्हात्रे, दत्ता मुंबईकर, मनोहर ठाकूर, धनाजी फोफेरकर, सरिता ठाकूर, रोशनी घरत, गजानन घरत, ज्ञानेश्वर घरत यांच्यासह इतर सेवा सदस्य उपस्थित होते.

Exit mobile version