स्वच्छता मोहीम उत्साहात

| तळा | वार्ताहर |
तळा नगरपंचायतीतर्फे सोमवारी शहरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. रायगड जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद व नगरपंचायत मुख्याधिकार्‍यांच्या बैठकीत रायगड जिल्ह्यात स्वच्छता अभियान राबविण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याअनुषंगाने तळा शहरातील जोगवाडी, नगरपंचायत परिसर, बाजारपेठ यांसारख्या विविध ठिकाणी नगरपंचायत प्रशासन व ग्रामस्थांनी मिळून स्वच्छता मोहीम राबविली. या स्वच्छता मोहिमेत मुख्याधिकारी माधुरी मडके, नागराध्यक्षा अस्मिता भोरावकर, उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे यांसह सर्वपक्षीय नगरसेवक, कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Exit mobile version