| माथेरान | वार्ताहर |
स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत स्वच्छ अमृत महोत्सव म्हणून साजरा करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने शनिवारी दि.17 सप्टेंबर रोजी कचरा मुक्त शहरच्या उद्देशाने इंडियन स्वच्छता लीगचे आयोजन माथेरानमध्ये करण्यात आले होते. माथेरान हिरो टीमने दस्तुरी नाका येथे स्वच्छता मोहीम नगरपरिषदेच्या प्रशासक सुरेखा भणगेंच्या पुढाकाराने स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.
यामध्ये जवळपास चाळीस गोणी इतका सर्व प्रकारचा प्लास्टिक कचरा गोळा करण्यात आलेला आहे. यावेळी स्वच्छता विभागाचे अधिकारी अभिमन्यु येळवंडे, राजेश रांजाणे, अन्सार महापुळे, नरेंद्र सावंत, लक्ष्मण दरवडा, उमेश मोरे, अर्जुन पारधी, विश्वास सातपुते यांसह धनगर समाज अध्यक्ष राकेश कोकळे, दुष्यंत वरपे, टॅक्सी चालक सुध्दा सहभागी झाले होते.
हरित माथेरानला आणि आपल्या पर्यावरणाला धोका होणार नाही.येणार्या काळात माथेरान शहराची जी पर्यटन आणि प्रदूषणमुक्त ओळख आहे ती तशीच राहील. यासाठी सर्वांनी एकत्रपणे काम करुया
सुरेखा भणगे( शिंदे) मुख्याधिकारी