। कोर्लई । प्रतिनिधी ।
शासनाच्या आरोग्य विभागाच्या आदेशानुसार राज्यातील सर्व रुग्णालये व आरोग्य संस्थामध्ये स्वच्छता सप्ताह तसेच प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी स्वच्छता मोहीम राबविण्यात येत असून त्याचाच भाग मुरुडच्या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिक्षक डॉ.उषा चोले यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णालय परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
यावेळी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ.उषा चोले, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व कर्मचारी वृंद स्वच्छता अभियानात सहभागी झाले होते.