| रोहा | प्रतिनिधी |
रायगड जि.प. प्राथमिक शाळा सोनगाव येथून स्वच्छता रॅली व ग्राम परिसर स्वच्छता, स्वच्छ भारत, सुंदर भारत अभियान अंतर्गत स्वच्छता मोहीम उपक्रम राबवण्यात आला. हा उपक्रम सुदर्शन केमिकल लिमिटेड, रायगड जि. प. शाळा सोनगाव व ग्रुप ग्रामपंचायत मढाली खुर्द यांच्या संयुक्त विद्यमानाने रविवारी (दि.11) राबविण्यात आला. यावेळी सोनगाव शाळेपासून ते गावापर्यंत स्वच्छता रॅली काढण्यात आली. गावातील परिसराची साफसफाई करून सुक्या कचऱ्याचे योग्य ते व्यवस्थापन करण्यात आले. या राष्ट्रीय कार्यासाठी सुदर्शन केमिकल सीएसआरचे प्रतिनिधी संग्राम पाटील, सुदर्शन क्लॅरिएंट सीएसआरचे प्रतिनिधी पराग फुकणे, सुनिल दळवी, ग्रामसेविका प्रतिक्षा कांबळे, शाळेचे मुख्याध्यापक संतोष धोत्रे, शिक्षक ब्रिजेश भादेकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिपक भोईर, उपाध्यक्ष राधा शेलार, सुशील खांडेकर, अर्चना चव्हाण, सुजाता वाघमारे, राजेंद्र खांडेकर, अनंता जंगम, स्वप्निल बलकावडे, संध्या शेलार, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष प्रमोद खांडेकर, खजिनदार योगेंद्र जाधव, पोलीस पाटील योगेश जंगम, माजी उपसरपंच मेघना शेलार, नितेश शेलार, उत्तम गोळे, सखाराम गोळे आदि ग्रामस्थ व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.







