| म्हसळा | प्रतिनिधी |
म्हसळा येथील कोकण उन्नती मित्र मंडळ संचलित वसंतराव नाईक कला, वाणिज्य व बॅरिस्टर ए. आर. अंतुले विज्ञान महाविद्यालयात सेंट्रल ट्रेनिंग ऍड प्लेसमेंट सेल, ऑन जॉब ट्रेनिंग व विद्यार्थी कौशल्य विकास विभागा अंतर्गत रोजगार मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
इन्स्टिट्यूट फॉर एक्सलन्स ॲण्ड प्लॅनिंग संस्था, ऐरावत ग्रुप, खालापूर (आय.ई.एस.पी.) यांच्या सहकार्याने आयोजित या मेळाव्यात एअरपोर्ट व विमानसेवा क्षेत्रातील विविध रोजगार संधींबाबत विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यशाळेत केबिन क्रू व हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, एअरलाइन हँडलिंग मॅनेजमेंट, एक्स-रेड कॅप, हेल्थकेअर मॅनेजमेंट, एअरपोर्ट ऑपरेशन मॅनेजमेंट, रॅम्प इक्विपमेंट ऑपरेटर आदी क्षेत्रांतील करिअरच्या संधींची माहिती देण्यात आली. तसेच प्रशिक्षणाचा कालावधी, प्रवेश प्रक्रिया, उपलब्ध संधी, प्रारंभिक वेतन, तसेच भविष्यातील पदोन्नती याबाबत विद्यार्थ्यांच्या शंकांचे समाधान करण्यात आले.
कार्यक्रमात इन्स्टिट्यूट फॉर एक्सलन्स ॲण्ड प्लॅनिंग संस्था, ऐरावत ग्रुप, खालापूर याठिकाणी प्रशिक्षण पूर्ण करत असलेले विद्यार्थी श्रद्धा पवार, तनिष्का भालेराव, स्वराज वायकर, मुस्कान यांनी संस्थेकडुन मिळणारे प्रशिक्षण आणि दिल्या जाणाऱ्या सोयीसुविधा याबाबतीत अनुभवकथन केले. यावेळी त्यांनी नवी मुंबई एअरपोर्टवर निर्माण होणाऱ्या संधीचा आपल्या कोकणातील विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे विद्यार्थ्यांना आवाहन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाच्या सेंट्रल ट्रेनिंग ऍड प्लेसमेंट सेल, ऑन जॉब ट्रेनिंग व विद्यार्थी कौशल्य विकास विभागा समितीचे प्रमुख प्रा. राजेंद्र हलोर, तुषार उमासरे, मयुर बढे,अतिका नजिरी, सलमा नजिरी, सोनाली तांबे, सॉलिहा मुक्कादम, डॉ.संजय बेद्रें, डॉ एम.एच. सिद्दीकी, कानिफ भोसले, प्रा.माशाले आय.क्यु. ए .सी सेलचे प्रमुख डॉ.सुरेश दुंडे यांच्यासह सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि शंभरहून अधिक विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या करिअर घडणीत मोलाची दिशा देणारा हा रोजगार मार्गदर्शन मेळावा अत्यंत उपयुक्त ठरल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.







