रायगड किल्याची स्वच्छता मोहीम

। कोलाड । वार्ताहर ।

गोवे-कोलाड येथील तटकरे चॅरिटेबल ट्रस्ट संचलित डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी महाविद्यालय संस्थेचे सचिव संदीप तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी (दि.7) मुंबई विद्यापीठांतर्गत तसेच विद्यार्थी कल्याण मंडळातर्फे रायगड किल्ला स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमात महाविद्यालयातील 40 विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन यशस्वीपणे स्वच्छता मोहीम राबवली.

यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख प्रतीक्षा पडवळ, डॉ. सूर्यकांत अमलपुरे, जयवंती अडलीकर, प्राजक्ता शिंदे, निखिल हरणेकर यांचे सहकार्य विद्यार्थ्यांना लाभले. या स्वच्छता मोहिमे अंतर्गत रायगड किल्ल्यावरील होळीचा माळ ते रोपवे पर्यंतच्या रस्त्यावरील साफ-सफाई विद्यार्थ्यांनी केली. तसेच, होळीचा माळ ते राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीपर्यंत स्वच्छता मोहीम राबविली.

तसेच, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू भामरे, विद्यार्थी कल्याण मंडळाचे डॉ. सुनील पाटील व शिंदे यांनी विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन केले. या स्वच्छता मोहिमेची सांगता सांस्कृतिक कार्यक्रमाने करण्यात आली. या यशस्वी स्वच्छता मोहिमेचे स्वागत व कौतुक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विश्‍वास देशमुख व संस्थेच्यावतीने करण्यात आले.

Exit mobile version