। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत येथील प्रादेशिक कृषी संशोधन केंद्रातर्फे महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्जत भात संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. भरत वाघमोडे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण संशोधन केंद्र परिसर स्वच्छ करण्यात आले. कर्जत भात संशोधन केंद्रात कार्य करणारे सर्व अधिकारी तसेच कर्मचारी वर्गाने या मोहीमेत सहभाग घेतला होता. ही स्वच्छता मोहीम संशोधन केंद्रातील प्रशासकीय कार्यालय, आय.एफ.एस. मॉडेल, संशोधन केंद्राचे प्रक्षेत्र, दोन्ही प्रवेशद्वार इत्यादी परिसर शास्त्रज्ञ, अधिकारी, कर्मचारी व मजूर यांनी संयुक्तरित्या झाडून स्वच्छ केला. यानंतर गोळा झालेल्या प्लास्टिक पिशव्या, पाण्याच्या बॉटल्स आदी टाकाऊ वस्तूंची योग्य विल्हेवाट लावण्यात आली.