पथनाट्यातून शहीद तुणतुणे स्मारकाचे स्वच्छता अभियान

सांडपाणी व सार्वजनिक स्वच्छतेसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

शहीद तुणतुणे स्मारक, सहाण जन शिक्षण संस्थान रायगड व ग्रामपंचायत सहाण यांच्या संयुक्त विद्यामानाने शुक्रवारी (दि. 22) पथनाट्याच्या माध्यमातून सहाण येथे स्वच्छता जनजागृती करण्यात आली. यावेळी उपस्थितांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली. याशिवाय मोफत कापडी पिशव्या, मास्कचे वाटप करण्यात आले.तसेच श्रमदानकरून बाजार परिसरात स्वच्छता करण्यात आली. प्रकल्प वाणी यांच्या कलारंग सांस्कृतिक सामाजिक संस्थेतर्फे पथनाट्य सादर करण्यात आले.

यावेळी सहाण येथे वर्मी कंपोस्टिंग व रेन वॉटर हार्वेस्टिंग संदर्भातील प्रात्यक्षिके दाखवून ग्रामस्थांनी सांडपाणी व्यवस्थापन व सार्वजनिक स्वच्छतेसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन शेकापचे तालुका चिटणीस अनिल पाटील यांनी केले. हा कार्यक्रम संस्थापक अध्यक्षा डॉ. मेधा किरीट सोमैया, डॉ. नितीन गांधी व व्यवस्थापक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.

यावेळी जन शिक्षण संस्थान रायगडचे डॉ. नितीन गांधी, शेकाप तालुका चिटणीस अनिल पाटील, नरेश वर्तक, विजय कोकणे, अ‍ॅड. नीला तुळपुळे, प्रतिक्षा चव्हाण, सुकन्या नांदगावकर, स्नेहा म्हात्रे, अजय पाटील, नवनाथ पोईलकर, भरती पोईलकर, प्रकल्प वाणी, योगेश पाटील, सिद्धार्थ धुमाळ, सिद्धी नालरे, निर्मिती पाटील उपस्थित होते.

Exit mobile version