कोयना ब्रदर यांचा स्तुत्य उपक्रम
| रसायनी | प्रतिनिधी |
योग दिनाचे औचित्य साधून कोयना जांब्रुक वावंढळ येथील तरुणांनी मारुती, शंकर मंदिर आणि शिवकालीन तलाव परिसरात स्वच्छता मोहीमेबरोबर वृक्षारोपण करून समाजप्रबोधनचा संदेश दिला.
सकाळी योग दिन साजरा केल्यानंतर सर्व उपस्थित तरुणांनी गावतील मारुती मंदिर, शिव मंदिर येथे स्वच्छता मोहीम राबवून फुल झाडे आणि पर्यावरण पूरक झाडे लावली. त्यानंतर गावच्या शिवकालीन तलावाच्या परिसरात स्वच्छता राबविण्यात येऊन येथील प्लास्टिक संकलन केले. सुकलेले गवत कापणे व परिसर स्वच्छ करून तलावाच्या काठावर व भोवती वड, पिंपळ आणि पर्यावरण पूरक झाडे लावली, पूर्वी लावलेली झाडे यांची पुन्हा उभारणी केली. लावलेल्या झाडांच्या आजुबाजुचे सुकलेले गवत काढून टाकले. दोन तरुणांनी एक झाड दत्तक घेतले. तर दर शनिवारी, रविवार आणि सुट्टीच्या दिवशी स्वच्छता मोहीम, वृक्ष लागवड आणि त्यांची जोपासना करण्याचा निर्णय घेतला. तरुणांच्या या पर्यावरणपूरक कार्यक्रमाचे गावातून कौतुक होत आहे.
