| कर्जत | प्रतिनिधी |
जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत माथेरान मध्ये मुख्याधिकारी वैभव गारवे यांच्या मार्गदशर्नाखाली स्वछता अभियान राबविण्यात आले. या अभियांना अंतर्गत शहरातील कस्तुरबा गांधी रोड साफसफाई, गटारे तसेच गटारांमधील पावसामुळे साचलेला पाला पाचोळा स्वच्छ करण्यात आला. तसेच काही वाढलेल्या झाड्यांच्या फांद्या, विद्युत पोल वरील अस्ताव्यस्त केबल व्यवस्थित करण्यात आल्या.
रस्त्याच्या बाजूला मोकळ्या जागेत रंगरंगोटी करून परिसर सुशोभिकरण करण्यात आला तर रस्त्याच्या बाजूला असलेले खराब साहित्य उचलण्यात आले. यावेळी गटरात पडलेल्या रिकाम्या बाटल्या उचलून स्वच्छ करण्यात आले, रस्त्यालगत असलेल्या मोकळ्या जागेवर यावेळी वृक्षारोपण देखील करण्यात आले. या अभियानात नगरपरिषद स्वच्छता निरीक्षक नरेंद्र सावंत,अभियंता अभिमन्यु येळवंडे, लेखपाल अंकुश ईचके, सदानंद इंगळे, प्रवीण सुर्वे, पर्जन्यमापक निरीक्षक अन्सार महापुळे, जयवंत वर्तक, गोपाल चव्हाण, ज्ञानेश्वर सदगीर, अर्जुन पारधी, अमित भस्मा यांच्यासह नगरपालिकेचे कर्मचारीवर्ग उपस्थित होते