पनवेल तालुक्यात शाळा सुरु होण्याचा मार्ग मोकळा

। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल तालुक्यातील शाळा सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कोरोनामुळे मागील दीड वर्षापासून बंद असलेल्या शाळा 4 ऑक्टोबर पासुन सुरु होणार आहेत.यामध्ये शाळेत हेल्थ केअर क्लिनिक सुरु करण्याची महत्वाची अट शासनाने घातली आहे.ग्रामीण भागातील इयत्ता 5 वी ते 12 व शहरी भागातील 8 वी ते 12 वीच्या सर्व शाळा या निर्णयामुळे सुरु होणार आहेत. पनवेल तालुक्यात जिल्हा परिषद,पनवेल महानगरपालिकेच्या मालकीसह खाजगी शाळा व महाविद्यालये मोठ्या प्रमाणात आहेत.हि संख्या शेकडोंच्या घरात असल्याने पुन्हा एकदा ओस पडलेल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची रेलचेल पहावयास मिळणार आहे.पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी यासंदर्भात 29 सप्टेंहर रोजी परिपत्रक काढून विविध अटी शर्तीच्या आधार तालुक्यातील शाळा सुरु करण्यास परवाणगी दिली आहे. शाळा सुरु करताना विविध अटी व शर्तीचे पालन करण्याच्या सूचना या परिपत्रकात करण्यात आलेल्या आहेत.यामध्ये शाळेत हेल्थ केअर क्लिनिक सुरू करण्याच्या महत्वपूर्ण अटींचा समावेश आहे.

Exit mobile version