| उरण | वार्ताहर |
द्रोणागिरी डोंगरालागत असलेल्या डाऊरनगर येथील वस्तीजवळील दरड कोसळली होती. यामध्ये कोणतीही दुर्घटना होऊ नये म्हणून तहसीलदार उद्धव कदम यांनी जातीने लक्ष घालून रविवारी डोंगरावर धोकादायक वाटणारे दगड व माती नागरी संरक्षण दल व स्थानिकांच्या मदतीने काढण्यात आली.
आपत्कालीन मदतीसाठी असलेल्या ग्रुपचे सदस्य, नागरी संरक्षण दल पदाधिकारी व उरण तालुका मराठी पत्रकार संघाने तहसिलदार उद्धव कदम यांच्याशी संपर्क साधून खबरदारी घेण्याची मागणी केली. त्यानंतर घटनास्थळी मंडळ अधिकारी व तलाठी यांना पाठवून पहाणी करण्यास सांगितले.
तहसीलदार उद्धव कदम यांनी आज सकाळ पासून संरक्षण दल व स्थानिकांच्या मदतीने द्रोणागिरी डोंगरावर धोकादायक ठरणारे दगड व माती काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यामुळे सध्या तरी धोका टळला आहे. तहसीलदार उद्धव कदम यांनी तत्परतेने मोहीम हाती घेतल्याबद्दल व घटनास्थळी काम करणाऱ्या नागरी संरक्षण दल, स्थानिक जनतेला तेथील रहिवासी धन्यवाद देत आहेत.