कर्जतसह मुंबईतील चौघांचा समावेश मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत येथील गिर्यारोहक संतोष दगडे हे माऊंट एव्हरेस्ट शिखर गाठण्यासाठी मोहिमेवर निघाले आहेत. मुंबई परिसरातून या मोहिमेवर निघालेल्या चार गिर्यारोहकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. दरम्यान, या गिर्यारोहकांना शासन सर्वतोपरी मदत करेल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले असून, शनिवारी एक एप्रिल रोजी ते मोहिमेसाठी रवाना झाले.
कर्जत,डोंबिवली ठाणे आणि मुंबई येथील चार गिर्यारोहक आपल्या एकूण 15 सहकारी गिर्यारोहक यांच्यासह माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करण्यची तयारी करीत होते. गेली सहा महिने कर्जतकरांनी मिशन माऊंट एव्हरेस्ट ही कँपेन चालविली होती. गिर्यारोहक संतोष दगडे यांनी जगातील हे अतिउच्च शिखर सर करावे म्हणून आ. महेंद्र थोरवे यांनी दगडे यांच्या मोहिमेला हातभार लावण्यासाठी 1,11,111 रुपयांची आर्थिक मदत केली आहे. मात्र प्रत्येक गिर्यारोहक यास या मोहिमेसाठी भारतातील गिर्यारोहक यांना किमान 42 लाखांची गरज लागत असते. त्यामुळे त्या सर्व गिर्यारोहकांना आर्थिक मदत व्हावी यासाठी संतोष दगडे आणि त्यांच्या अन्य सहकार्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यामुळे राज्य सरकार मदत करेल, असे आश्वासन दिले आहे.
दरम्यान, नेपाळ आणि नंतर हिमालयातील वातावरण व्यवस्थित असल्यास चार एप्रिल रोजी सुरू झालेली माऊंट एव्हरेस्ट मोहीम 43 व्या दिवशी म्हणजे 18 मे रोजी त्यांना माऊंट एव्हरेस्टवर नेईल. त्याचबरोबर कर्जत शहर तालुका, रायगड जिल्हा आणि महारष्ट्र राज्याचे नाव या जगातील सर्वात उंच अशा माऊंट एव्हरेस्ट शिखरवर नेऊन पोहचविणारे असणार आहे, अशा शुभेच्छा अनेकांनी व्यक्त केल्या.