कर्जतमध्ये क्लिनिकला आग

| कर्जत | प्रतिनिधी |
महावीर पेठ रस्त्यावर असलेल्या श्री परमार स्मृती क्लीनिक माहेर या क्लिनिकमध्ये गुरुवारी( 9 फेब्रुवारी ) पहाटे 5 च्या सुमारास आग लागली नागरिक, वीज वितरण कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्परता दाखवल्याने पुढील अनर्थ टळला. योगेश चंपालाल ओसवाल हे पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास मंदिरात जात असताना त्यांना शहरात मध्यवर्ती ठिकाणी श्री परमार स्मृती क्लिनिक याठिकाणी डॉ. रेखा काकडे यांचे माहेर हे क्लिनिक आहे या क्लिनिक च्या शटर मधुन धूर येताना दिसला त्यांनी आजू – बाजुच्या लोकांना उठवले, यावेळी संजय ओसवाल, राकेश ओसवाल, माजी नगरसेवक नितिन परमार,शशिकांत कडव, चिंतन परमार, विक्रम ओसवाल घटनास्थळी उपस्थित झाले.

नितिन परमार यांनी डॉ. रेखा काकडे यांना फोन करून घटना घडल्याचे सांगितले, त्या क्लिनिकची चावी घेऊन आल्या, क्लिनिकचे शटर उघडताच आतून धुराचे लोट येत होते, त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते पंकज ओसवाल यांनी नगरपरिषदेचे आरोग्य विभागाचे सुदाम म्हसे यांच्याशी संपर्क करून अग्निशमन दलाला पाचारण केले, अग्निशमन दलाचे दिनेश हिरे, प्रदीप हिरे, मारुती रोकडे यांनी क्लिनिक मध्ये जावून आग विझवली, शॉटसर्किट मुळे क्लिनिक मधील गादी ने व इतर वस्तूने पेट घेतला होता,ही घटना वेळीच लक्षात आल्याने पुढील मोठा अनर्थ टळला.

Exit mobile version