दुर्घटनाग्रस्त जिल्ह्यांना मुख्यमंत्र्यांकडून मदतीची घोषणा

महाड | विशेष प्रतिनिधी |
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी दुपारी महाड येथे भेट दिली. यावेळी त्यांनी रायगड, रत्नागिरीसह राज्यातील इतर पुरग्रस्त आणि दुर्घटनाग्रस्त जिल्ह्यांना मदतीची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या दर्घटनेतील मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत व जखमींच्या उपचाराचा खर्च शासनातर्फे करण्यात येईल, असं सांगिलं आहे. ही आपत्ती कोसळलेल्या कुटुंबीयांच्या दुःखात आपण सहभागी आहोत, असेही ते म्हणाले.

Exit mobile version