| मुंबई | प्रतिनिधी |
मुंबईच्या ओशिवरा डेपोतील सीएनजी बसला आग लागल्याची घटना घडली आहे. या बसला आग लागल्यानंतर क्षणार्धात आगीचा भडका उडाला. या बसला आग लागल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या ओशिवरा डेपोत असणाऱ्या सीएनजी बसने दुरुस्ती करत असताना अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे. बसने पेट घेतल्यानंतर नागरिकांची एकच धावाधाव झाली. ओशिवरामध्ये आग लागलेली ही सीएनजी बस खासगी कंत्राटदार हंसा सिटी यांच्या मालकीची असल्याची माहिती मिळाली आहे. या सीएनजी बस दुरुस्तीचं काम सुरु असताना अचानक आग लागली. या आगीमुळे बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. डेपोतील अग्निविरोधक यंत्राच्या साहाय्याने बसला लागलेली आग विझविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.