। माणगाव । वार्ताहर ।
छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण संचालित माध्यमिक शाळातील विद्यार्थ्यांचे रायगड विभागीय विज्ञान प्रदर्शन अभिनव ज्ञानमंदिर उसर खुर्द विद्यालयात संपन्न झाले. या विज्ञान प्रदर्शनात माध्यमिक विद्यामंदिर रातवड, अभिनव ज्ञान मंदिर व सर खुर्द, सरस्वती विद्यामंदिर वडघर मुद्रे व जय जवान जय किसान विद्यालय वाघेरी विद्यालयातील इयत्ता सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
विभागीय विज्ञान प्रदर्शनात एकूण 31 विद्यार्थ्यांनी 16 प्रतिकृतींचे सादरीकरण केले. शालांतर्गत झालेल्या विज्ञान प्रदर्शनातून प्रथम क्रमांक प्राप्त प्रतिकृतींचे सादरीकरण यावेळी करण्यात आले. या विज्ञान प्रदर्शनात माध्यमिक विद्यामंदिर रातवड व अभिनव ज्ञान मंदिर उसर खुर्द विद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांकाची पारितोषिके प्राप्त केली आहेत. इयत्ता सहावीमध्ये अभिनव ज्ञान मंदिर उसर खुर्द विद्यालयाचे राणी पागार, उत्कर्षा नटे, इयत्ता सातवीमध्ये माध्यमिक विद्यामंदिर रातवड विद्यालयाची विद्यार्थिनी दिया साठम, इयत्ता आठवीमध्ये माध्यमिक विद्यामंदिर विद्यालयाचा विद्यार्थी पार्थ सुतार, इयत्ता नववीमध्ये अभिनव ज्ञानमंदिर उसर खुर्द विद्यालयाची सिद्धी पतारे यांनी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले आहे.
प्रथम क्रमांकाच्या प्रतिकृती संस्था स्तरावर होणार्या विज्ञान प्रदर्शनात सहभागी होणारा असून रायगड विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. औषधी वनस्पती, सौर ऊर्जा, तंत्रज्ञान, शेती आधारित प्रतीकृतींचे विद्यार्थ्यानी सादरीकरण केले.