। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील आंबिवली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अखत्यारीत असलेल्या अंजप येथील आरोग्यवर्धिनी आरोग्य केंद्राच्या माध्यमातून किशोरवयीन मुलींची आरोग्य तपासणी करण्यात आली. 10 ते 18 वयोगटातील मुलींची आरोग्य तपासणी आणि हिमोग्लोबिन तपासणी यावेळी वैद्यकीय अधिकार्यांनी केली.
जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या आंबिवली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अखत्यारीत असलेल्या अंतर्गत आरोग्यवर्धिनी उपकेंद्र अंजपमधील कळंबोलीवाडी येथे किशोरवयीन मुलींची तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. युनायटेड वे यांच्या सहकार्याने कळंबोली वाडी येथे 10 ते 18 वर्ष वयोगटातील किशोवयीन मुलींचे आरोग्य तपासणी आणि हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली. यावेळी समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. रूपेश सोनावळे, आरोग्य सेविका भावना महाले, महालॅबच्या सुषमा डामसे, आशासेविका नम्रता देशमुख तसेच युनायटेड वे संस्थेच्या सुजाता कोळी, मुख्यमंत्री कौशल्य योजने अंतर्गत असलेले अंकुश भगत यांनी काम पाहिले.