को.ए.सो. शिक्षक अनिल पाटील सेवानिवृत्त

। रेवदंडा । वार्ताहर ।
रेवदंडा येथील उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाचे शिक्षक अनिल गोमा पाटील हे सेवानिवृत्त झाले असून, त्यांच्या निरोप समारंभ कार्यक्रम नुकताच रेवदंडा को.ए.सो. संकुलाच्या प्रांगणात पार पडला. यावेळी जिल्हा परिषद शेकापक्षाचे प्रतोद अ‍ॅड. आस्वाद पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

अनिल पाटील यांनी आपल्या 34 वर्षांच्या कार्यकाळात को.ए.सो. संकुलात को.ए.सो. जा.र.ह. कन्याशाळा अलिबाग, मेहंदळे हायस्कूल रोहा व कनिष्ठ महाविद्यालय रोहा, तसेच स.रा. तेंडुलकर विद्यालय, रेवदंडा याठिकाणी सेवा बजावली आहे. त्यांच्या निरोप समारंभ कार्यक्रमास अ‍ॅड. आस्वाद पाटील यांच्यासह भावना पाटील, सभापती प्रमोद ठाकूर, रेवदंडा को.ए.सो. चेअरमन सरोज वरसोलकर, प्रा. स्नेहलता म्हात्रे, तसेच रेवदंडा ग्रामस्थ सदाशिव मोरे, राजन वाडकर, सविता वाडकर आदी उपस्थित होते. यावेळी अनिल पाटील यांचा सपत्नीक शाल, श्रीफळ प्रदान करून प्रमुख अतिथी अ‍ॅड. आस्वाद पाटील व भावना पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Exit mobile version