| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारतीय तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. हेलिकॉप्टरचे गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर आपात्कालीन लँडिग करण्यात आले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टरमध्ये एकूण चार क्रू मेंबर होते. यातील तीन क्रू मेंबर बेपत्ता आहेत . आयसीजीचे हेलिकॉप्टर अरेबियन समुद्रामध्ये कोसळले आहे. रात्री11 वाजताच्या सुमारात हा अपघात झाला आहे. एका जखमी क्रू मेंबरला वाचवण्यात यश आले आहे. तिघांचा शोध अद्याप सुरु आहे. आयसीजी ने दिलेल्या माहितीनुसार, एएलएच हेलिकॉप्टरला आपात्कालीन लँडिग करावे लागले. त्यावेळी हेलिकॉप्टर समूद्रात कोसळले आहे. अपघातावेळी चार क्रू मेंबर हेलिकॉप्टरमध्ये होते. एका क्रू मेंबरला वाचवण्यात यश आले आहे. तिघांचा शोध घेण्यासाठी सर्च ऑपरेशन राबवण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चार जहाजे आणि दोन एअरक्राफ्ट या कामासाठी लावण्यात आले आहेत. युद्ध पातळीवर बेपत्ता असलेल्या क्रू मेंबरचा शोध सुरु आहे.
एएलएच हेलिकॉप्टर बचावकार्यासाठी अरेबियन समुद्रात तैनात करण्यात आले होते. यावेळी प्रतिकूल परिस्थितीमुळे अपघात झाला आहे. आयसीजीची टीम बेपत्ता क्रू मेंबरना शोधण्यासाठी काल रात्रीपासून प्रयत्न करत आहे. मोठ्या भागात सर्च ऑपरेशन सुरु आहे