। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल शहरातील शाळा, कॉलेज परिसरात रोड रोमिओ तसेच दुचाकी व चारचाकी वाहनातून रॅश ड्रायव्हींग करणार्यांविरुद्ध आता पनवेल शहर पोलिसांनी कारवाई करण्याची मोहिम सुरू केली आहे.
गेल्या अनेक दिवसापासून शहरातील शाळा, कॉलेज परिसरात अशा रोड रोमिओंचा नाहक त्रास विद्यार्थीनींना होत होता. त्या संदर्भात अनेक तक्रारी पनवेल शहर पोलीस ठाणे तसेच वाहतूक पोलिसांकडे विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षाद्वारे करण्यात आल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत वपोनि नितीन ठाकरे यांनी या रोडरोमिओंविरोधात कारवाईचा बडगा उगारण्यास सुरूवात केली असून त्या अंतर्गत अशा प्रकारे रॅश ड्रायव्हींग करणार्यांविरुद्ध मोटार अॅक्टप्रमाणे कारवाई करण्यात येणार आहे.