दांडा मित्रमंडळ आयोजित नारळ फोडी स्पर्धा; सोहम तोडणकरची बाजी

। श्रीवर्धन । वार्ताहर ।
वाढत्या महागाईच्या दृष्टीने लोप पावत चाललेला कोकणातील नारळ फोडी खेळ स्पर्धेच्या माध्यमातून सुरू ठेवण्याचे काम श्रीवर्धन दांडा मित्र मंडळ गेल्या अनेक वर्षांपासून करत आहेत. सालाबादप्रमाणे यंदादेखील नारळी पौर्णिमा निमित्त नारळ फोडी स्पर्धा संपन्न झाल्या.

रायगड जिल्ह्यातील आठ स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. यावेळी दिवेआगरच्या स्पर्धकांनी बाजी मारली. दिवेआगर येथील सोहम तोडणकर यांना प्रथम पारितोषिक रक्कम रुपये 5001/- देऊन भंडारी समाज सेक्रेटरी अनंत सालदुरकर व राजन पोलेकर यांच्या हस्ते गौरवण्यात आले. द्वितीय क्रमांक विजेते दिवेआगर येथील निखिल वारगे यांना रक्कम रुपये 3001/- व चषक देऊन माजी भंडारी समाज अध्यक्ष संतोष नागवेकर व भावेश मांजरेकर यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. उत्कृष्ट फटकेबाज दिवेआगरच्या रोहन पाटील व शितबद्ध संघ म्हणून दिवेआगरच्या शेखर भाटकर यांना गौरवण्यात आले

Exit mobile version